Uday Samant

Uday Samant : महाराष्ट्रात लवकरच येणार 1500 कोटींचा कोको कोला उद्योग; उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा

4349 0

राज्यातील उद्योग परराज्यात गेल्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात काही महिन्यांपूर्वी जोरदार जुंपली होती. परराज्यात गेलेल्या उद्योगांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्याचवेळी विरोधकांमुळेच हे उद्योग राज्याबाहेर गेल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. यादरम्यान आता उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

काय म्हणाले उदय सामंत ?
मी उद्योग मंत्री झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच पंधराशे कोटी रुपयांचा कोका कोलाचा उद्योग उभारला जात आहे. या माध्यमातून हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. चिपळूण मधील वशिष्टी नदीतील बहादुरशेख नाका ते गोवळकोट येथील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!