दिवाळी स्पेशलमध्ये आज पाहूयात ‘नारळाचा चव आणि खव्यापासून सुरेख करंज्यांची रेसिपी

387 0

दिवाळी फराळाला सुरुवात केलीत का? अनेक गृहिणींनी सामानाची जमवाजमा करायला सुरुवात नक्कीच केली असणार आहे. चला तर मग आज पाहूयात ओला नारळ ,गुळ आणि खव्यापासून बनवली जाणारी सुरेख करंजी.

साहित्य : ओल्या नारळाचा चव, गुळ, खवा (हे तीनही पदार्थ समप्रमाणात घ्यायचे आहेत.) , ड्राय फ्रुट्स,तूप, गव्हाची कणिक ,मैदा तळणीसाठी तेल, वेलची पूड, जायफळ ,मीठ.

कृती : सर्वात प्रथम एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घ्यावे. यामध्ये एक वाटी गूळ घालून तो चांगला वितळेपर्यंत सारखा हलवत राहावा. गुळ पूर्ण वितळल्यानंतर त्यामध्ये ओल्या नारळाचा चव घालावा. या ठिकाणी ओल्या नारळाचाच चव घ्यायचा आहे.

हे मिश्रण चांगले एकत्र करून त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट बारीक करून घालावेत. पूर्ण पूड ड्रायफ्रूटची केली नाही तर चालेल. ओबडधोबड पूड घालावी. त्यानंतर यामध्ये खवा घालावा. त्यातर हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यावे .चांगली वाफ आल्यानंतर वरतून वेलची पूड जायफळ आणि अगदी छोटा बारीक चमचा मीठ घालावे. आपले सारण बनवून तयार आहेत. आता मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला एका ताटात काढून घ्या.

यानंतर कणिक दोन वाटी घेतली असल्यास एक मोठा चमचा मैदा घालून गरम तेलाचे मोहन घालून कणिक भिजवून घ्या. या कणकेला दहा मिनिटे रेस्ट द्यावी. तोपर्यंत तळणीचे तेल गरम करायला गॅसवर ठेवावे. ते चांगले कडकडीत झाल्यानंतर कणकेचा पुरी एवढा गोल लाटून घेऊन यामध्ये सारण भरावे आणि अर्धगोल करून घेऊ आवश्यक असल्यास दुधाचा हात लावून करंजीची कड चांगली दाबून घ्यावी.

करंजीचा आकार दिल्यानंतर ती छान खरपूस अशी तळून घ्यावी. खवा ,ओले खोबरे आणि गुळाची गोडी जिभेवर बराच वेळ राहते अशा या सुरेख करंज्या तयार आहेत.

Share This News
error: Content is protected !!