नॉर्मल डिलिव्हरीसाठी फक्त करा रोज ‘हा’ व्यायाम, शरीर आयुष्यभर राहील ठणठणीत

274 0

बाळंतपण हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील दुसरा जन्मच असल्याचे समजले जाते. पण आज जे मी तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट हमखास जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा मनाला सांगत राहायचे आहे. ज्या निसर्गाने तुम्हाला आई होण्याची ताकद दिली आहे, तोच निसर्ग तुम्हाला बाळंतपणातील आणि बाळाला जन्म देताना होणारा त्रास सहन करायची ताकद देतच असतो. त्यामुळे ज्या होणाऱ्या माता , मला त्रास सहन होईल का? या विचाराने स्वतः दडपण घेतात त्यांनी स्वतःच्या मनाला सर्वात पहिले तयार करायचे आहे. निसर्गावर विश्वास ठेवा…!

आणि आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातील अनुभवी आणि ज्येष्ठ स्त्रिया मार्गदर्शन करत असणारच.  काय खावं,केव्हा खावं, कसं खावं या प्रत्येक गोष्टीच्या पथ्यांमध्ये योग्य वेळी औषधोपचार ही तुम्ही करत असणार. पण महत्त्वाचं म्हणजे बाळाला जन्म देताना तुम्हाला तुमचे मन आणि तुमचे शरीरच फक्त साथ देणार आहे. यामध्ये मोठा संबंध आहे तो तुमच्या श्वासाचा… हो तुम्ही बरोबर ऐकत आहात.

बाळाला जन्म देताना श्वास कसा घ्यायचा? कसा रोखायचा? या गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्यात… यासाठी तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून सुरुवात करायची आहे ती ओंकाराचा व्यायाम करण्याची… अर्थात रोज हळूहळू 5,11,21… असा ओंकार करा.

तुमच्या श्वासोच्छवासाची ताकद जितकी बळकट असेल तितकं तुमचं शरीर बळकट होईल. आणि जेव्हा बाळाला बाहेर ढकलण्याची वेळ येईल त्यावेळी हलका श्वास ओढण आणि तो रोखून बाळाला या जगात येण्यासाठी ताकद लावून मदत करणे एकार्थी तुम्हालाच त्रासातून लवकरात लवकर मोकळं करण्यासाठी महत्त्वाचा आहे. यासाठी अनेक पुस्तक उपलब्ध आहेत तुम्ही त्यातूनही मार्गदर्शन घेऊ शकता. परंतु जर तुम्ही लवकरच आई होणार असाल तर अजूनही वेळ गेलेली नाही रोज ॐमकार कराच आणि आयुष्यभर शरीर ठणठणीत मिळवा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!