ऐकावं तेवढं नवलचं ! थंडीने भरली हुडहुडी, तरीही आईने सांगितली आंघोळ करायला ! मुलाने थेट केला पोलिसांना फोन, आणि मग….

650 0

ऐकावं तेवढं नवलचं ! असंच तुम्ही म्हणाल अशी एक घटना समोर आली आहे. तर झालं असं की, सर्वात प्रथम या मुलाला त्याच्या पद्धतीने केस कापायचे होते. पण त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या स्टाईलने केस कापू दिले नाहीत. म्हणून त्याला राग आला. केस कापून त्यानंतर घरी आल्यावर एवढ्या थंडीमध्ये आईने त्याला आंघोळ करायला सांगितली. मग आई-बाबा दोघेही ओरडत होते म्हणून या बहाद्दरान थेट पोलिसांना फोन लावला.

हि घटना उत्तर प्रदेश मधील हापूड मध्ये घडली आहे. पोलीस देखील घरी आले आणि नक्की काय झालं ? हे समजल्यावर एकच हशा पिकला. यावर पोलिसांनी त्या मुलाची समजूत काढली आणि प्रकरण मिटवल आहे. पण या घटनेने परिसरात मुलाचे हे वर्तन आणि थंडीचा कडाका हा विनोदाचा विषय ठरतोय.

Share This News
error: Content is protected !!