दिवाळी स्पेशलमध्ये आज पाहूया नारळाचा चव आणि रव्याचे खुसखुशीत लाडू

318 0

आजच्या दिवाळी स्पेशलमध्ये आपण पाहणार आहोत नारळाचं चव आणि रव्याचे खुसखुशीत लाडू कसे बनवायचे. जिभेवर ठेवताच अगदी सहज विरघळणारे हे लाडू घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडतील असे खूप छान बनतात. त्यामुळे या दिवाळीमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा…

साहित्य : बारीक रवा, खवलेला नारळ, दुधाची पावडर, तूप, साखर, वेलची, ड्रायफ्रूट्स

See the source image

कृती : सर्वप्रथम बारीक रवा हलका भाजून घ्या. त्यानंतर त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप घाला, बरोबरीने एका बाजूला एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी आणि दीड वाटी साखर ठेवा. तोपर्यंत साखरेचा पाक तयार होईल.

तुपामध्ये नारळाचा चव घालून एक सारखा परतून घ्यावा हलका गुलाबी रंग आल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स पावडर (ओबडधोबड कुटलेले ड्रायफ्रूट्स) वेलची पावडर घालून मध्यम आचेवर परतून घ्या. यानंतर यामध्ये तीन मोठे चमचे दुधाची पावडर घाला. आणि भाजलेला रवा घालून सर्व मिश्रण एकसारखे हलवून घ्या.

खमंग असा वास सुटल्यानंतर गॅस बंद करावा. साखरेचा पाक एकतारी झाल्यानंतर हे संपूर्ण मिश्रण या पाकामध्ये घालावे आणि मिश्रण चांगले हलवून घ्यावे. गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी तसेच सोडून द्या. हे सर्व मिश्रण कोमट झाल्यानंतर दुधाचा शिपका मारून हाताला तूप लावून छान लाडू वळून घ्या. तयार आहेत ओल्या नारळाचा चव आणि रव्याचे खुसखुशीत लाडू…

Share This News
error: Content is protected !!