महत्वाची बातमी : पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राज्य कारागृह अपर पोलीस महासंचालक,पुणे पदावर नेमणूक

295 0

पुणे : राज्य पोलीस दलातील 30 वर्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या मंगळवारी गृह विभागाने बदल्या केल्या आहेत. यामध्ये पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची उप्पर कायदा सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य मुंबई येथे बदली करण्यात आली होती.

दरम्यान अवघ्या पाचच दिवसात अमिताभ गुप्ता यांची पुन्हा बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत . पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची आता राज्य कारागृह अपर पोलीस महासंचालक पुणे पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

२१ सेप्टेंबर २०२० रोजी आयपीएस अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला . त्यानंतर पुण्यातील अवैध धंदे , गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर देखील वचक बसला . पुण्यात आजपर्यंत 100 हुन अधिक टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच ८० हुन अधिक गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करून त्यांनी सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या या निडर पावलामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे . गणेशोत्सवाच्या आधी शहरातील रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगारांना अटक करून शहरात शांतता स्थापित राहील याची पूर्ण काळजी पुणे पोलिसांनी आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली.

Share This News
error: Content is protected !!