महाराष्ट्राला भरली हुडहुडी : मुंबईचे तापमान सर्वात कमी; तर मराठवाड्यासह विदर्भात देखील थंडीचा कडाका वाढला !

300 0

महाराष्ट्र : काही दिवसापासून तापमानात घट होते आहे. खऱ्या अर्थानं आता हिवाळा सुरू झाला, असं वातावरण निर्माण झाल आहे. काही दिवसांपासून वातावरणात अचानक उष्णता तर पाऊस देखील झाला. पण आता संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. यावर्षी मुंबईचे सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आले आहे. त्यासह मराठवाडा आणि विदर्भ देखील थंडीन गारठला आहे.

धुळे जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे. धुळे जिल्ह्याचे तापमान आठ पूर्णांक चार नोंदवण्यात आल आहे. उद्या मुंबईतील किमान तापमान आणखी कमी होणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रान व्यक्त केला. तर ख्रिसमसनंतर मुंबईत थंडी वाढणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला होताच.

महाराष्ट्र जरी गोठला असला तरी हे वातावरण रब्बी हंगामातील पिकांसाठी चांगल आहे. ही थंडी पिकांच्या वाढीसाठी पोषक असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Share This News
error: Content is protected !!