पुण्यात पुन्हा भयानक हत्याकांड; हॉटेल मॅनेजरवर पाठलाग करून कोयत्याने वार; सिहंगड रोडवर थरार

377 0

पुणे : सिंहगड रोडवरील धायरीमध्ये पुन्हा एकदा एक धक्कादायक हत्याकांड घडले आहे. धायरी येथील एका 24 वर्षीय युवकावर कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, 24 वर्षीय भरत कदम हा तरुण गारवा बिर्याणी या हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. शनिवारी रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान तो काम संपवून बाहेर पडला असता काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये भरत कदम यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!