महत्वाची बातमी ! सरपंच प्रवीण गोपाळे हत्या प्रकरणी चौघांना अटक

1122 0

मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी कोयत्याने वार करत हत्या केली होती. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.

महेश भेगडे (रा. तळेगाव), मनीष ओव्हाळ (रा. जांभूळ), अशोक कांबळे (रा. कांब्रे) आणि अमोल गोपाळे (रा. शिरगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रवीण यांचे भाऊ रवींद्र गोपाळे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींना सहा एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिरगावमध्ये भर चौकात प्रवीण गोपाळे यांची हत्या करण्यात आली होती. सरपंच प्रवीण गोपाळे यांची हत्या करण्यापूर्वी हल्लेखोरांनी रेकी केल्याची माहिती समोर येत आहे. संबधित व्यक्ती प्रवीण गोपाळे असल्याची खात्री पटल्यानंतरच त्यांनी त्यांच्यावर हल्ला करत कोयत्याने सपासप वार केले. आपला जीव वाचवण्यासाठी ते धावत होते. वार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलले असताना गोपाळे यांना नागरिकांनी रुग्णालयात नेले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले होते.

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याआधारे पोलिसांचा तपास सुरु आहे. गोपाळे यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. त्यातूनच त्यांची हत्या केल्याच्या संशय पोलिसांना आहे.

Share This News
error: Content is protected !!