संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ट्राय करा हिरव्या मुगाचे हिरवी मिरची घालून केलेले झणझणीत भजे

431 0

संध्याकाळी सर्वांना फार मोठा प्रश्न असतो कि संध्याकाळच्या स्नॅक्स साठी सर्वांना काय द्यावे. मी आज तुम्हाला एक सोपा प्रकार सांगणार आहे. जो बनवण्यासाठी अवघा पंधरा मिनिटांचा वेळ सुद्धा पुष्कळ झाला. हिरव्या मिरची घालून आणि हिरवे मूग भिजवून केलेले हे गरमागरम भजे थंडगार दह्यासोबत खायला द्या. कुटुंबीय नक्कीच खुश होतील.

यासाठी सर्वप्रथम एक वाटी हिरवे मूग भिजत घाला. दोन ते तीन तासानंतर हे हिरवे मूग चांगले भिजवून येतील
त्यासह आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, मीठ, जिरे,ओवा डाळीचे पीठ, लिंबू, तळणीसाठी तेल

आता सर्वप्रथम भिजवलेले हिरवे मूग उपसून घ्या. त्यानंतर मिक्सर जारमध्ये घालून त्यावर आल्याचा एक तुकडा, एक चमचा जिरे, एक छोटा चमचा ओवा, चवीनुसार मीठ, एक वाटी भिजवलेल्या मुगासाठी चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून हे वाटण एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या. हे वाटण आता एका बाऊलमध्ये काढून घ्या. यामध्ये एक मोठा चमचा डाळीचे पीठ घाला. डाळीचे पीठ घातले नाही तरीही भजे छान होतील.

यावर आता एक लिंबू पिळून याला एक सारखे मळून घ्या. एकीकडे तेल तापायला ठेवा. तेल कडकडीत तापले की यामध्ये गोल भजे तळायला सोडा. अगदी अर्धा मिनिटांमध्ये हे भजे छान तळून येतील. खरपूस असे भजे तळून झाल्यानंतर हे गरमागरम भजे थंडगार दह्यासोबत सर्वांना सर्व्ह करा.

Share This News
error: Content is protected !!