मुंबई : सध्या बॉलीवूडमध्ये बॉयकॉटचे वादळ सुरू आहे. त्यामुळे चित्रपट निर्माते आणि कलाकारांमध्ये देखील धाकधूक सुरूच आहे. मोठे चित्रपट वाईट पद्धतीने फ्लॉप झाल्यानंतर बॉलिवूडच्या शहंशाहने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर करून चहात्यांना एक सुखद धक्का दिला आहे.
या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चनसह दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील दिसून येते आहे. बऱ्याच दिवसानंतर काहीतरी चांगले पाहायला मिळेल या आशेने चहात्यामध्ये देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून अमिताभ बच्चन यांनी हे पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट करून कॅप्शन मध्ये लिहिले आहे की , “कुटुंब ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे,कोणी जवळ नसतानाही त्यांची भावना कायम राहते.”