…अखेर ठरलं! कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा ‘सस्पेन्स’ संपला; ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडली मुख्यमंत्रीपदाची माळ

3857 0

बंगळुरू: कर्नाटक स्पष्ट बहुमतात (Karanataka cm) काँग्रेसनं सत्ता मिळवल्यानंतर डी.के. शिवकुमार (DK Shivkumar) की सिद्धरामय्या (Siddhramaiyya) यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पद पडणार याचीच उत्सुकता लागली होती. 

डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केल्यानंतर काँग्रेसकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री ठरविण्यासाठी काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, जितेंद्र सिंग, दीपक बाबारिया यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयी आमदारांशी चर्चा केल्यानंतर या दोघांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आपला अहवाल सादर केला होता.

त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार तिकडं साऱ्यांचं लक्ष लागलं होतं अखेर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स संपला असून सिद्धरामय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील तर डी.के. शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा निर्णय घेतला असून 20 मे रोजी नव्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

 

Share This News
error: Content is protected !!