VIJ VITARAN

VIDEO : पिंपरी एमआयडीसी परिसरात बारा तासांपासून वीज गायब ! 630 कंपन्यांचं उत्पादन ठप्प; उद्योजक हैराण

270 0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात काल मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळं एमआयडीसी परिसरात मागील बारा तासांपासुन वीज पुरवठा खंडित झालाय. वीज पुरवठा अचानक खंडित झाल्यानं एमआयडीसी परिसरातील उद्योजक हैराण झाले आहेत.

वीज पुरवठा खंडित झाल्यानं पिंपरी एमआयडीसी परिसरातील जवळपास 630 कंपन्यांची उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली आहे. पिंपरी एमआयडीसी परिसरातील सेक्टर सहा आणि सातमधील ऑटोमोबाइल इंडस्ट्रीवर याचा मोठा परिणाम झालाय. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!