अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहराध्यक्षपदी श्री मयुर गुजर यांची निवड

1135 0

अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर व जिल्हा कार्यकारिणी कार्यकारिणीची बैठक झाली या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री दिलीपदादा जगताप,राष्ट्रीय चिटणीस श्री दशरथ पिसाळ व महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख श्री अनिल ताडगे, संस्थापक सदस्य श्री जगजीवन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व पदाधिकारी यांच्या एक मताने श्री मयुर सोमनाथ गुजर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली व नियुक्तीचे पत्र मा. दिलीपदादा जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.

या वेळेस अखिल भारतीय मराठा महासंघाचे मा. अध्यक्ष श्री वैभव शिळीमकर, कार्याध्यक्ष श्री मंगेश साखरे, संपर्क प्रमुख राजेश केदारी व राजेंद्र पासलकर, उपाध्यक्ष श्री सुभाषराव ढमाले, उपाध्यक्ष श्री अभिजीत ताठे, पुणे शहर महिला अध्यक्षा आरती मारणे,पुणे जिल्हा महिला अध्यक्षा ज्योती कोंडे, जिल्हाध्यक्ष पुणे  प्रशांत वांढेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष पुणे तुषार शेळके, जिल्हा सरचिटणीस श्री दुष्यंतराजे जगताप व महासंघाचे अनेक सभासद,कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide