औरंगाबाद मध्ये दुहेरी हत्याकांड : पत्नी आणि अडीच वर्षाच्या चिमुकलीची मोबाईलच्या वायरने गळा घोटून हत्या; पती आणि सासू अटकेत

736 0

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. पतीने पत्नीची आणि अवघ्या अडीच वर्षाच्या बाळाची मोबाईलच्या वायरने गळा आवळून क्रूरतेने हत्या केली आहे. या हत्या प्रकरणी पती आणि त्याच्या आईला ताब्यात घेण्यात आल आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, औरंगाबाद मधील समीर म्हस्के राहणार भाग्यनगर, बाबा पेट्रोल पंपाजवळ, औरंगाबाद याचे त्याच्या पत्नीशी सातत्याने भांडण होत होते. पतीला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यावरूनच दोघांमधला वाद चिघळला आणि पतीने पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीची मोबाईल वायर आणि नायलॉन दोरीने गळा आवळून हत्या केली आहे.

मुलीच्या माहेरकडच्या लोकांनी समीर म्हस्के यांच्यासह त्याच्या आईवर देखील गंभीर आरोप केले आहेत. मुलाला पत्नीची हत्या करण्यासाठी त्याच्या आईनेच सांगितले असल्याचे समजल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी समीर म्हस्के आणि त्याची आई सुनीता म्हस्के यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!