मुंबई : हि घटना घडली होती 2017 मध्ये… संबंधित अल्पवयीन मुलगी ही रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाजारात गेली होती. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग केला. तसेच तिला वाईट हेतूने स्पर्श करण्याचा प्रयत्न करून तिच्या ओठांवर शंभर रुपयांची नोट फिरवली आणि तू असा क्यू कर रही है तू इतना भाव क्यू खा रही है अशा शब्दात तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले पण ही डायलॉग बाजी आता या तरुणाला चांगलीच भोगली आहे कारण मुंबई उच्च न्यायालयाने POCSO कायद्याअंतर्गत या रोडरोमिओला एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
ही घटना घडल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी संबंधित आरोपीच्या घरच्यांना जाब विचारला असता आरोपीच्या घरच्यांनी मुलीच्या आईलाच शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा पंचनामा आणि मुलीने दिलेला जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर तिला न्यायदंडा अधिकाऱ्यांकडे नेण्यात आले. न्याय दंडाधिकाऱ्यांच्या समक्ष जबाब नोंदवल्यानंतर आरोपीला 14 जुलै 2017 रोजी अटक करण्यात आली होती. तर एप्रिल 2018 मध्ये पुन्हा जामीन देखील मिळाला होता. मात्र पिडीतेच्या कुटुंबीयांनी योग्य पाठपुरावा केल्यामुळे तिला अखेर न्याय मिळाला आहे.