आज 8 नोव्हेंबर 8 नोव्हेंबर 2016 ही तारीख भारताच्या आर्थिक इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने 500 आणि 1000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः याबाबतची घोषणा केली. नोटबंदीला आज सहा वर्ष पूर्ण झाली आहेत.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि बनावट नोटा चलनात आणून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करू पाहणाऱ्या देशातील एका गटाला नेस्तनाबूत करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे पंतप्रधान मोदींनी जाहीर केल होतं. आज सहा वर्षानंतर ऑनलाईन अर्थव्यवहारात कमालीची वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. भारताच्या डिजिटल आर्थिक व्यवहारात गेल्या पाच वर्षात झपाट्याने वाढ झाली आणि त्यातही कोरोनाच्या मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर डिजिटल व्यवहारांचा वापर झाला आहे भारतात आर्थिक डिजिटल व्यवहारांसाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आयएमपीएस भीम युपीआय यांसारखे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.
भारतात मोठ्या प्रमाणावर डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली असून आता ऑनलाइन व्यवहार वाढवतानाच नागरिकांकडे असलेल्या रोख रकमेचे प्रमाण कमी करणे हे केंद्र सरकार समोरील मोठं आव्हान असणार आहे.