Ministry of Shipping : दीनदयाळ बंदर प्राधिकरण कंटेनर टर्मिनल आणि बहुउद्देशीय मालवाहतूक बर्थ विकसित करणार

224 0

मुंबई : डीपीए अर्थात दीनदयाळ बंदर प्राधिकरणाने सार्वजनिक- खासगी भागीदारी तत्वावर बांधा-कार्यान्वित करा-हस्तांतरित करा पद्धतीने सुमारे 5,963 कोटी रुपये खर्चाचे दोन प्रचंड मालवाहतूक हाताळणी टर्मिनल विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

भविष्यात किनारपट्टी भागातील गरजा भागवता याव्या आणि गुजरात तसेच शेजारी राज्यांतील दुर्लक्षित उद्योगांना फायदा व्हावा या उद्देशाने प्राधिकरणाने कच्छ जिल्ह्यात ट्युना-टेकरा येथे मालवाहतूक टर्मिनल आणि बहुउद्देशीय मालवाहतूक बर्थ देखील विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रकल्पांविषयी माहिती देण्यासाठी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दीनदयाळ बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष एस.के.मेहता म्हणाले की दोन भव्य मालवाहतूक हाताळणी प्रकल्पांमुळे बंदरावरील कोंडी सुटायला मदत होईल आणि कंटेनर तसेच मालाच्या हाताळणीसाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी कमी होईल. “या दोन प्रकल्पांमध्ये देशाच्या पश्चिम भागाचा आर्थिक स्तर बदलून टाकण्याची क्षमता आहे,”ते पुढे म्हणाले.प्रकल्पांच्या फायद्याविषयी बोलताना अध्यक्ष मेहता म्हणाले, “कांडला बंदर मोठ्या प्रमाणावर मालाच्या हाताळणी क्षमतेसाठी सुप्रसिध्द असले तरीही या बंदरातून कंटेनर्सची वाहतूक फार कमी प्रमाणात होत असते. येथील वाहतुकीमध्ये वाढ होताना दिसत आहे. या प्रकल्पांमुळे कांडला बंदराचा देशातील अनेक मोठ्या आकाराच्या बंदरांमध्ये समावेश होईल.”

दीनदयाळ बंदर प्राधिकरणाविषयी माहिती :

महाराव खेनगर्जी यांनी 1931 मध्ये बांधलेल्या आरसीसी धक्क्याच्या उभारणीपासून दीनदयाळ बंदराचा प्रवास सुरु झाला. दीनदयाळ बंदर प्राधिकरण म्हणूनही प्रसिध्द असलेले कांडला हे पश्चिम भारतातील गुजरात राज्यात कच्छ जिल्ह्याच्या सागरकिनाऱ्यावर गांधीधाम शहराजवळील बंदर आहे

Share This News
error: Content is protected !!