सप्तशृंगी देवीच्या मूळ, स्वयंभू स्वरूपातील मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी VIDEO

345 0

नाशिक : शारदीय नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. नाशिकमधील भाविकांना देवी सप्तश्रृंगीचे मुळ रुपात दर्शन घेण्याची आस लागली असल्यानं घटस्थापनेच्या मुहूर्तावर आई भगवतीचे मूळ अष्टभुजा रूपात भाविकांना दर्शन झालं.

सप्तश्रृंगी गडावर मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सवाचा प्रारंभ झाला आहे. वर्षानुवर्षांपासून शेंदूरलेपनात असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीचे यंदा संवर्धन झाले आहे. सुमारे दोन हजार किलो शेंदूर काढण्यात आल्यामुळे मूळ रुपातील देवी यंदाच्या नवरात्रोत्सवाचे खरे आकर्षण आहे. देवीचे शेंदूर कवच उतरवण्यासाठी व मूर्तीच्या संवर्धनासाठी जवळपास एक महिना सप्तश्रृंगी गड भाविकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.

४५ दिवसांत श्री सप्तश्रृंगी देवी मूर्तीवरील तब्बल दोन हजार किलो शेंदूर काढण्यात आला.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तश्रृंगी देवीचा गड हिरवाईने नटला आहे. गडावरील अनेक लहान मोठे झरे प्रवाही झाले आहेत. चैत्रोत्सवात तळपते उन असते, मात्र नवरात्रोत्सवात गड निसर्गसौंदर्याने बहरलेला असतो. खान्देशसह, अहमदनगर, नाशिक, पुणे, औरंगाबाद येथून येणाऱ्या भाविकांसाठी नवरात्रोत्सव म्हणजे भगवतीच्या दर्शनासह एक निसर्गपर्वणीच असते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!