मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर उद्या सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 12 मंत्र्यांचा उद्या शपथविधी होणार आहे.
दरम्यान हा शपथविधी राजभवन ऐवजी विधिमंडळात होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जनतेतून निवडून आलेल्यांनाच मंत्रीमंडळात संधी मिळणार असून विधान परिषदेच्या एकाही आमदाराला दिले जाणार मंत्रीपद नाही. अशी माहिती समोर येत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थखाते राहणार असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.