विक्षिप्त हत्याकांड : अभ्यासाचा कंटाळा…,पालकांचा ओरडा खावा लागू नये म्हणून जेलमध्ये जाण्याचा केला प्लॅन ; मित्राची केली निघृण हत्या

274 0

मध्यप्रदेश ( गाझियाबाद ) : आज पर्यंत तुम्ही एखाद्याची हत्या केली म्हणून आरोपीने दिलेले उत्तर ऐकून अचंबित झाला नसाल एवढे हे घटना ऐकून व्हाल . आपल्या मुलाने अभ्यासात , त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हावं असं प्रत्येक आई बापाला वाटत असतं . तसंच या आरोपीच्या आई-वडिलांनाही वाटत होतं. पण अभ्यास करण्याचा कंटाळा येतो आणि आई वडिलांचा ओरडा खाऊन वैतागलेल्या त्या दहावीतल्या मुलानं थेट जेलमध्ये जाण्याचा प्लॅन केला .

त्यामुळे आई-वडिलांचा ओरडाही खावा लागणार नाही असा त्याचा समज होता आणि यातूनच त्याने हत्येचा कट रचला . या संपूर्ण वादविवादामध्ये एका तेरा वर्षीय बालकाचे प्राण गेले आहेत . सोमवारी सायंकाळी या 13 वर्षीय मुलाचा मृतदेह दिल्ली मिरज एक्सप्रेस-वे खाली आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला असता, या दहावीत शिकणाऱ्या आरोपीचे धागेदोरे सापडले . आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले .

त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबवावातून धक्कादायक माहिती समोर आली आहे . अभ्यास करत नाही म्हणून आई-वडील सातत्याने ओरडतात, म्हणून या मुलाची हत्या केली असल्याचे त्याने कबुल केले . त्याने सर्वप्रथम त्याचा गळा दाबला आणि त्यानंतर बियरची बाटली फोडून त्याच काचेने त्याचा गळा चिरला.

या आरोपीचं वय आहे अवघे सोळा वर्षे … त्याला अभ्यासात रस नव्हता . आतापर्यंत त्याने दोन वेळा दहावीची परीक्षा दिल्याचे समजते . परंतु त्यामध्ये तो यशस्वी होऊ शकला नाही . या दडपणानेच त्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!