IMP News : केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला ; संघ कार्यकर्ता जखमी

146 0

केरळ : केरळ मधून एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. मंगळवारी सकाळी केरळ मधील कुन्नूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे. यापूर्वी संघ, भाजपच्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते,नेते यांना देखील टार्गेट करण्यात आलं होतं.यासह डाव्या विचारांच्या नेत्या कार्यकर्त्यांवरही हल्ले करण्यात आले आहेत.
या हल्ल्यामध्ये संघाचा एक कार्यकर्ता जखमी झाला असून, त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून एक कार्यकर्ता जखमी झाला आहे.
या घटनेवर ” सामाजिक संघटनांवर बॉम्ब फेकणे इतपत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे.”अशी प्रतिक्रिया भाजपचे टॉम वडकन यांनी दिली आहे. तसेच भाजप आणि डाव्या नेत्यांमध्ये या घटनेवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

Share This News
error: Content is protected !!