मोठी बातमी : सिटी कॉर्पोरेशनचे डायरेक्टर आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांच्या घर आणि कार्यालयावर आयकर विभागाकडून छापेमारी

475 0

पुणे : पुण्यात आयकर विभागाकडून सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे यांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली असल्याचे समजते आहे.

अनिरुद्ध देशपांडे हे सिटी कॉर्पोरेशनचे डायरेक्टर आणि अमनोरा पार्कचे प्रमुख आहेत. आज पहाटेपासूनच आयकर विभागाकडून अनिरुद्ध देशपांडे यांच्या घराची आणि कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली आहे.

दरम्यान आर्थिक गैरव्यवहाराचा संशय या कारवाईचे प्रमुख कारण असल्याचे समजते. अनिरुद्ध देशपांडे हे पुण्यातील बडे उद्योजक असल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांशी देखील त्यांचे जवळचे संबंध असून, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे देखील ते निकटवर्तीय समजले जातात.

Share This News
error: Content is protected !!