मोठी बातमी : भारत जोडो यात्रेमध्ये माजी मंत्री नितीन राऊत जखमी; दीक्षा राऊत यांनी ट्विट करून दिली माहिती

204 0

नागपूर : महाराष्ट्राचे माजी मंत्री नितीन राऊत भारत जोडो यात्रेदरम्यान जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. नितीन राऊत यांची मुलगी दीक्षा राऊत यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे भारत जोडो यात्रेदरम्यान धावपळीमध्ये ते जखमी झाले असल्याचे समजते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हैदराबाद मध्ये सुरू आहे माजी ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत हे या यात्रेमध्ये सहभागी झाले या यात्रेमध्ये प्रचंड गर्दी झाली असताना धावपळीमध्ये ते पडले आणि यामध्ये त्यांच्या डोक्याला जखम झाली असून पायाला देखील मुका मार लागला आहे.

दीक्षा राऊत यांनी ट्विट करून सांगितले की हैदराबाद मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान माझे वडील बेशुद्ध झाले त्यांच्या डोक्याला छोटी जखम झाली आहे मला आशा आहे की ते लवकरच बरे होतील आणि महाराष्ट्रात पोहोचल्यावर जनआंदोलनात सामील होतील

Share This News
error: Content is protected !!