BIG NEWS : भीमाशंकरला निघालेल्या खासगी बसनं घेतला अचानक पेट; 26 प्रवासी महिला बचावल्या, बस खाक… पाहा VIDEO

378 0

घोडेगाव : नाशिक येथील बस दुर्घटना ताजी असतानाच पुण्यातही अशीच एक बस दुर्घटना घडलीये. घटना उघडकीस आली आहे. या घटनेत भीमाशंकरला जाणाऱ्या एक खासगी ट्रॅव्हल्स बसनं अचानक पेट घेतला. बसमधील 26 प्रवासी महिला सुदैवानं बचावल्या मात्र या घटनेत बस भस्मसात झाली. आंबेगाव तालुक्यातील घोडेगावजवळ हा अपघात घडला.

नाशिक येथे खासगी ट्रॅव्हल्स बसला आग लागल्यानं 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना पुण्यात आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर जवळ एक खासगी ट्रॅव्हल्स बसनं पेट घेतल्यानं या आगीत बस खाक झाली. बसला आग लागल्याची घटना वेळीच लक्षात आल्यानं बसमधील 26 प्रवासी बालंबाल बचावले. घोडेगाव जवळ पिंपळगाव घोडे गावच्या हद्दीत भिवंडी येथून श्री क्षेत्र भीाशंकरकडं निघालेल्या प्रवासी महिलांच्या बसला आग लागली. भिवंडी पाये गावातील या 26 प्रवासी महिला रात्री अकरा वाजता भीमाशंकरकडं निघाल्या होत्या.

सकाळी साडेसहाच्या सुमारास घोडेगावच्या पुढं बस आली असता तिच्या बाजूनं जाणाऱ्या एका एसटीचालकानं गाडीतून धूर निघत असल्याचं बसचालकाला सांगितलं. चालकानं तात्काळ बस बाजूला घेऊन लावली असता बसनं पेट घेतल्याचं चालकाच्या लक्षात आलं. त्यानंतर सर्व प्रवासी महिला बसमधून तातडीनं उतरल्या आणि काही क्षणात संपूर्ण बस भस्मसात झाली. यावेळी पिंपळगावचे उपसरपंच लक्ष्‍मण वाघमारे, शिंदेवाडीचे उपसरपंच संजय शिंदे तसेच स्थानिक पोलिसांनी धावाधाव करत टँकर मागवला आणि जळती बस विझवण्याचे प्रयत्न केले. प्रवासी महिलांचे सर्व साहित्य या आगीत खाक झाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!