पिंपरी-चिंचवडमध्ये सेल्स मॅनेजरकडून बीएएमएस महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार VIDEO

426 0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात एका सेल्स मॅनेजरनं लग्नाचं आश्वासन देऊन एका बीएएमएस महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अंजिम नूरमोहम्मद तांबोळी या 31 वर्षीय सेल्स मॅनेजर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सन 2019 पासून 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत संत तुकाराम नगर येथे अंजिम नूर मोहम्मद तांबोळी यानं पीडित महिला डॉक्टरवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. पीडितेनं पोलिसात तक्रार देऊ नये म्हणून आरोपीनं तिला एका सदनिकेत काही दिवस डांबून देखील ठेवलं होतं, असं पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. पीडितेच्या महिला डॉक्टरच्या फिर्यादीवरून पिंपरी पोलीसांनी आरोपी अजीम नूर मोहम्मद तांबोळी याला अटक केलीये.

Share This News
error: Content is protected !!