मशिदीवरील भोंग्यांबाबत आज सर्वपक्षीय बैठक; राज ठाकरे बैठकीला अनुपस्थित

114 0

 

ठाण्यातील सभेतून मनसे  अध्यक्ष राज ठाकरें यांनी 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या.

त्यातच आता गुजराती समाजाने मुंबईत बॅनर्ल  लावत राज ठाकरेंच्या भूमिकेचं जाहीर समर्थन केलं आहे. पण भोंग्याबाबत झालेल्या वादावरुन राज्य सरकार आता पुर्णपणे तयारीत आहे. धार्मिक स्थळांवरील भोंग्बायाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यासाठी राज्य सरकारने सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे.

 

या बैठकीला जवळपास सर्वच पक्षांनी उपस्थित राहण्यास संमती दिली असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत असे सांगण्यात आले आहे.

या बैठकीला राज जरी उपस्थित राहणार नसले तरी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई मनसेच्यावतीने उपस्थित राहणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!