भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने यावर्षीपासून पुरस्कार देण्यास सुरुवात झाली असून पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी प्रदान करण्यात आला.
मात्र या कार्यक्रमातला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याने मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमास अनुपस्थित राहणे पसंत केले.
यावरून आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे मंगेशकर कुटुंबाची ही कृती म्हणजे राज्यातील 12 कोटी जनतेचा अपमान आहे असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं
लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले.त्यांची ही भूमिका अगम्य आहे.या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे.#निषेद pic.twitter.com/xVarHhGfou
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 24, 2022