सकाळी उठल्यानंतर थेट स्वतःला आरशात न्याहाळताय ? थांबा.. त्याने तुमचा संपूर्ण दिवस होऊ शकतो खराब…

381 0

दिवसभराची शारीरिक आणि बौद्धिक मेहनत केल्यानंतर रात्री कधी एकदा अंथरुणावर अंग टाकून देतो असं वाटत असतं. दिवसभराची सगळी मरगळ दूर करण्यासाठी शरीराला आणि मेंदूला विश्रांती देणे शारीरिक आरोग्यासाठीही महत्त्वाच असतं. पण सकाळी जाग आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्ही नक्की काय करता ?

See the source image

आजकाल बरेच जणांना जाग आल्यानंतर सर्वप्रथम मोबाईल पाहण्याची सवय असते. काहीजणांना आपल्या आईचा चेहरा सर्वात प्रथम पाहण्याची इच्छा असते. काही जण देवाचे दर्शन घेऊन मग इतर कामकाजाला सुरुवात करतात. तर तुमच्यापैकी काही जण स्वतःला आधी आरशात पाहून मग दिवसाची सुरुवात करतात. जर का तुम्ही देखील यामधे असाल तर ही माहिती नक्की वाचा…

सकाळी उठल्यानंतर आईचा वडिलांचा चेहरा पाहिल्यावर दिवस चांगला जातो असा कदाचित तुम्हाला अनुभव आला असेल. काही जणांना देवदर्शन केल्यानंतर दिवस चांगला जातो असे वाटत असते. प्रत्येकाचं असं काही ना काही गणित असतातच. पण तुम्हाला माहित आहे का ? की हा लकी चेहरा खरंतर तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो. आणि म्हणूनच तुमचा दिवस चांगला जात असतो. असं तुम्हाला वाटत असतं.

हसतमुख दिसणारी आई किंवा वडील यामुळे जशी तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊ शकते तसेच उठल्यानंतर थेट स्वतःचा आळसावलेला चेहरा आरशामध्ये पाहिलात तर आणखी काय होणार आहे ? दिवस देखील आळसात जाईल त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला दिवस ताजा तवाना आणि लकी जावा तर आधी स्वतःला उठल्या उठल्या आरशात पाहणं बंद करा.

(ही माहिती कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्यासाठी नाही.)

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!