अभिनेत्री व्हीजे महालक्ष्मी आणि निर्माता रवींद्र चंद्रशेखर अडकले विवाह बंधनात ; लग्नातील फोटोंवरून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

282 0

दक्षिणात्य अभिनेत्री व्हीजे महालक्ष्मी आणि निर्माता रवींद्र चंद्रशेखरन हे नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली. दाक्षिणात्य पारंपारिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. आपल्या विवाहाचे फोटो या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट केले आहेत.

दाक्षिणात्य अभिनेत्री व्हीजे महालक्ष्मी आणि निर्माता रवींद्र चंद्रशेखरन यांनी लग्नगाठ बांधली आहे. कुटुंबीय आणि मोजक्या मित्रांच्या साक्षीने त्यांनी सहजीवनाची सुरवात केली.

यावेळी अभिनेत्री महालक्ष्मीने फोटो शेअर करून लिहिले आहे की, ” मी भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस. तुझ्या प्रेमामुळे… , तुझ्या असण्यामुळे माझं जगणं अधिक अर्थपूर्ण होतं, लव्ह यु अम्मू …! ”

हे दोघेजण आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदात आहेत . तथापि सोशल मीडियावर मात्र यांचे फोटो पाहून यूजर्स मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत आहेत . दरम्यान निर्माता रवींद्र चंद्रशेखरन यांच्याशी महालक्ष्मी हिने लग्न केले ही बाब अनेक युजर्सला रुचली नाहीये . ” महालक्ष्मी एवढी सुंदर आहे आणि तिने रवींद्रशी कसं काय लग्न केलं , पैशांच्या पुढे सगळं झूट आहे. ” असे अनेक जण म्हणत आहेत.

"मी भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस... तुझ्या प्रेमामुळे, तुझ्या असण्यामुळे माझं जगणं अधिक अर्थपूर्ण होतं. लव्ह यू अम्मू", असं कॅप्शन महालक्ष्मीने या फोटोंना दिलं आहे.

प्रेमामध्ये व्यक्तीचे सौंदर्य ,वय ,रंग-रूप हे महत्त्वाचं नसतं हे जरी खरं असलं तरी या दोघांचा जोडा पाहून यूजर्सनी निर्माता रवींद्र चंद्रशेखरन यांच्या आर्थिक सुबत्त्येलाच या लग्नाचे कारण ठरवले आहे.

Share This News
error: Content is protected !!