दुर्दैवी : शाळेत सोडवण्यासाठी जाताना अपघातात वडिलांसह लेकीचा मृत्यू

428 0

पुणे : सासवड रोडवर मुलीला शाळेत सोडविण्यासाठी जात असताना ट्रकच्या धडकेत वडिलांचा मृत्यू झाला.मुलीला उपचारासाठी घेऊन जात असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ग्लायडिंग सेंटर समोर सातववाडी येथे झाला.

नीलेश साळुंखे (वय ३५, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) मीनाक्षी साळुंखे (वय १०) अशी अपघातात मृत्यू झालेल्या बाप लेकीची नावे आहेत.
मीनाक्षी साळुंखे साधना विद्यालयामध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे.आपल्या मुलीला शाळेत सोडवण्यासाठी निखिल साळुंखे फुरसुंगीहून हडपसरच्या दिशेने चालले होते. त्यावेळी सातववाडी येथे पाठीमागून आलेल्या ट्रकची धडक बसल्याने दुचाकीचालकाचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला,बाजूला फेकल्या गेलेल्या मुलीला स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला.

ट्रकचालक दिलीप कुमार पटेल (रेवा, मध्य प्रदेश) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!