VIDEO : नवी मुंबईतला धक्कादायक प्रकार; दारूच्या नशेत चालवली स्कूल बस, आणि…

623 0

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या उलवे येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका शाळेचा बसचालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

नवी मुंबईतल्या उलवे परिसरात ही घटना घडली. बस चालक बसमधून 40 विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना बसने एका रिक्षाला धडक दिली. ही धडक सौम्य स्वरूपात असल्याने सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र बसचालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवतानाचा प्रकार उघडकीस आला आहे. या सर्व प्रकारामुळे शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये घबराटीच वातावरण निर्माण झालं. आता या बस चालकावर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!