भरधाव वेगात असलेल्या कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर 15 जण जखमी
राज्यातील अपघातांचा ग्रहण सुटेना, असे म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या नगर कल्याण महामार्गावर देखील आज एक भीषण अपघात झाला. महामार्गा नजीक असलेल्या ओतूर या ठिकाणी एसटी आणि बसचा अपघात झाला. यात दोन जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी झाले आहेत.
नगर कल्याण महामार्गावरील ओतूर या ठिकाणी एसटी आणि बस समोरासमोर आल्याने दोन्हीमध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये कारचे प्रचंड मोठे नुकसान झाले. तर कार मध्ये असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि बस मध्ये असलेले 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही एसटी बस पारनेर वरून मुंबईच्या दिशेने जात होती. तर अपघात झालेली कार आळेफाट्याच्या दिशेने जात होती. कार भरधाव वेगात असल्यामुळे एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. ज्या दोघांचा मृत्यू झाला असून एसटी बस मधील जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी ओतूर आणि आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.