पुण्यासाठी रविवार ठरला ‘अपघातवार’! शहरात मध्यरात्री घडलेल्या दोन अपघातात एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू तर एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी

343 0

पुण्यासाठी कालचा रविवार हा अपघात वार ठरला असून रविवारी रात्री शहरात दोन अपघातांच्या घटना घडल्या असून या अपघातात एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू तर एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाले आहेत.

पहिला अपघात मुंबई पुणे जुन्या महामार्गावर हॅरीस ब्रिजच्या खाली रविवारी मध्यरात्री पावणे दोन वाजता झाला असून या अपघातात खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करत असणारे पोलीस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरून निघाले असता पाठीमागून आलेल्या चार चाकी वाहनाने त्यांना धडक दिली या अपघातानंतर वाहन चालक आपल्या वाहनासह फरार झाला असून समाधान कोळी या पोलीस कॉन्स्टेबलचा या अपघातात मृत्यू झालाय तर पीसी शिंदे हे पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाले असून त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्या अपघातात पुण्यातील सीआयडीमध्ये कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने यांचा मृत्यू झालाय सचिन माने हे पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर भागातून दुचाकीवरून निघाले असता अज्ञात वाहनाने दिलेला धडकेत माने यांचा मृत्यू झालाय..

Share This News

Related Post

बोर्ड परीक्षेत कॉपी पुरवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार ; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश

Posted by - March 17, 2022 0
महाराष्ट्रात आता कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर बोर्डाने पुन्हा दोन वर्षांनंतर पुन्हा ऑफलाईन परीक्षा घेण्याचं आव्हान घेतलं आहे. दरम्यान बोर्डाच्या परीक्षा…
Sharad Mohol Murder

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी 11 जणांना घेतलं ताब्यात

Posted by - January 15, 2024 0
पुणे : शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आणखी आकरा जणांना…
Pune Crime

Pune Crime : पत्नीने पतीला घाबरवण्यासाठी अंगावर पेट्रोल ओतले मात्र तिचाच घात झाला

Posted by - September 22, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये (Pune Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये छळास कंटाळून पेट्रोल ओतून घेतलेल्या महिलेला पतीने पेटवल्याची घटना…

चिंचवडमध्ये स्नॅक्स सेंटरमध्ये सिलिंडरला आग, दुकान मालकासह दोघे जखमी

Posted by - May 3, 2022 0
पिंपरी- एका स्नॅक्स सेंटरमध्ये सिलेंडरने पेट घेतल्याने दुकान मालकासह दोघेजण गंभीररीत्या भाजले गेले आहेत. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या…
Bengaluru Cafe Blast

Bengaluru Cafe Blast : बंगळुरू हादरलं ! कॅफेमध्ये भीषण स्फोट; 4 जण जखमी

Posted by - March 1, 2024 0
बंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून भीषण स्फोटाची (Bengaluru Cafe Blast) घटना समोर आली आहे. यामुळे बंगळुरू शहर हादरलं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *