मुंबई : राज्यात सध्या नवे सरकार स्थापन झाले असून , नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वच जण लक्ष ठेवून आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त केव्हा लागतो हे अद्याप स्पष्ट झालेल नसताना , एक धक्कादायक माहिती समोर येथे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ४ जणांच्या टोळक्याने थेट आमदारांनाच फसवल्याचा प्रकार घडला आहे. नव्याने स्थापन होऊ घातलेल्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळ पद देण्याचे अमिष दाखवून तब्बल 100 कोटी रुपये मागितल्याचे समोर आले आहे. तर 17 जुलै रोजी या आरोपीने ओबेरॉय हॉटेलमध्ये या आमदारांची भेट देखील घेतल्याचं समजते आहे.
या आमदारांपैकी एक जण पुण्यातील असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे.एका आमदाराच्या सचिवाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून सापळा रचून साध्या वेशात पोलिसांनी या एका आरोपीला अटक केली . त्याची कसून चौकशी केली असता , याप्रकरणी रियाज अल्लाबक्ष शेख, योगेश मधुकर कुलकर्णी ,सागर विकास संघवी ,जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे . याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.