खेळ जगत : रोहित शर्माच्या षटकाराने सामना पाहायला आलेली चिमुरडी जखमी ; त्यानंतर रोहितने केले असे काही …पहा व्हिडिओ (Video)

479 0

इंग्लंड : मंगळवारी भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाचा दारुण पराभव केला. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १० गडी राखून इंडिया विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यात दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी तर केलीच,पण रोहित शर्मा देखील चांगलाच फॉर्ममध्ये खेळताना पाहायला मिळाला.या सामन्यामध्ये त्याने चांगलेच चौकार आणि षटकार मारून 76 धावांची जबरदस्त इनिंग खेळली. पण या मॅचमध्ये खेळाडूंच्या खेळापेक्षा एका घटनेने अधिक लक्ष वेधले.
तर झालं असं की, रोहित खेळत असताना एका बॉलवर त्याने जोरदार सिक्स लगावला,आणि हा बॉल थेट स्टेडियम मध्ये जाऊन एका चिमुरडीला लागला. या मध्येही चिमुरडी जखमी झाली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. पाहूयात हा व्हिडिओ…

https://twitter.com/SoniGup46462554/status/1546878622845501442?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1546878622845501442%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fsports%2Fcricket-news%2Frohit-sharma-six-hit-a-little-girl-in-the-crowd-during-india-vs-england-1st-odi-match-in-oval-london-au137-757652.html

चेंडू लागल्यानंतर ही चिमुरडी जखमी झाली. तिच्या सोबत तिचे वडील होते. त्यांनी आणि आसपासच्या लोकांनी तिला धीर दिला. या मुलीचं नाव मीरा साळवी असल्याचं समजते आहे. या ६ वर्षाच्या चिमुरडीला बॉल लागल्यानंतर मेडिकल स्टाफने देखील तिच्या मदतीसाठी धाव घेतली.सामना संपल्यानंतर रोहित शर्माने या मुलीची भेट घेतली. तिची भेट घेऊन रोहितने तिला टेडी आणि चॉकलेटचे गिफ्ट देखील दिल्याचे समजते.

Share This News
error: Content is protected !!