खेळ

WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीपमध्ये के. एल. राहुलच्या जागी मुंबईच्या ‘या’ खेळाडूला देण्यात आली संधी

मुंबई : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम (WTC Final) सामना 7 जून, 2023 रोजी लंडनच्या ‘द ओव्हल’ येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या अगोदर टीम इंडियाच्या खेळाडूंना दुखापतीने ग्रासले आहे. यामध्ये केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. जयदेव उनाडकट, उमेश यादव आणि शार्दूल ठाकूर यांनादेखील दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. यानंतर आता केएल राहुलची रिप्लेसमेंट जाहीर करण्यात आली आहे. केएल राहुलच्या जागी ईशान किशन याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून याची घोषणा केली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपसाठी टीम इंडिया (India’s squad for WTC final)
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , केएस भरत (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर, मोहम्द शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर)

Standby players: ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ (Australia’s squad for WTC final)
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.