WTC Final

WTC Final 2023 : टीम इंडिया अन् ऑस्ट्रेलिया भिडणार; जाणून घ्या कोण ठरेल कोणावर भारी?

963 0

नवी दिल्ली : टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघांमधली जागतिक कसोटी (World Test Championship Finals) विजेतेपदाची फायनल आज पार पडणार आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर (Oval Ground) खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही देशांकडे आयसीसीच्या (ICC) सर्वाधिक 11-11 ट्रॉफी आहेत. त्यामुळे जागतिक कसोटी विजेतेपदाची फायनल जिंकून आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकण्याचा बहुमान मिळविण्यासाठी दोन्ही संघ आपले सर्व कौशल्य पणाला लावून एकमेकांशी भिडणार आहेत. यामुळे ही फायनल जिंकून टीम इंडिया इतिहास घडविणार की ऑस्ट्रेलिया? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. चला तर मग जाणून घेऊया या दोन्ही आतापर्यंतची कामगिरी…

या मैदानावरील दोन्ही संघाची कामगिरी?
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्याबाबत बोलायचं झालं तर, या मैदानावर ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक सामने खेळले आहेत. तर टीम इंडियानं कांगारुंच्या तुलनेत कमी सामने खेळले आहेत. दरम्यान, दोन्ही संघांचा रेकॉर्ड फारसा खास नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानं लंडनच्या ओव्हल ग्राउंडवर 38 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी 7 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियानं 14 सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत. यामुळे या दोन्ही संघामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे.

दोन्ही संघाची एकमेकांविरुद्धची कामगिरी
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 106 कसोटी सामने खेळवण्यात आले आहे. त्यापैकी ऑस्ट्रेलियानं 44 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियानं केवळ 32 सामने जिंकले आहेत. त्यामुळे सध्या तरी ऑस्ट्रेलिया टीम इंडियापेक्षा वरचढ आहे. ओव्हल ग्राउंडवर टीम इंडियानं आपला शेवटचा सामना 2021 मध्ये खेळला होता. तर ऑस्ट्रेलियाने या मैदानावर शेवटचा सामना 2019 मध्ये खेळला होता.

कुठे पाहाल सामना?
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या (Star Sports Network) माध्यमातून टीव्हीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. तुम्ही दूरदर्शनवर या सामन्याचे मोफत थेट प्रक्षेपण पाहू शकणार आहेत. तसेच डिस्ने प्लस हॉटस्टारवर (Disney Plus Hotstar) या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

कधी आणि कुठे होणार सामना ?
भारतीय वेळेनुसार हा सामना आज दुपारी दुपारी 3.30 वाजता सामना सुरू होणार आहे. हा सामना लंडनमधील ओव्हल ग्राउंडवर खेळवला जाणार आहे.

WTC च्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया स्क्वॉड
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन (विकेटकीपर), केएस भरत (विकेकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट

स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जायसवाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव

Share This News
error: Content is protected !!