WPL Auction 2024

WPL Auction 2024 : मुंबई इंडियन्सने कोट्यवधींची बोली लावून ‘या’ साऊथ आफ्रिकेच्या फास्ट बॉलरला घेतले संघात

917 0

मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या (WPL Auction 2024) दुसऱ्या सिझनसाठी मुंबईमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. यंदाच्या लिलाव प्रक्रियेत मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे 5 संघ बोली लावणार आहेत. या लिलावासाठी 165 खेळाडूंनी आपले नाव नोंदवले होते. यामध्ये 104 भारतीय खेळाडू आणि 61 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावात मुंबई इंडियन्सने साऊथ आफ्रिकेच्या फास्ट बॉलरवर कोट्यवधींची बोली लावून तिला आपल्या संघात घेतलं आहे.

महिला प्रीमियर लीगच्या 2024 मुंबई इंडियन्सने साऊथ आफ्रिकेची अनुभवी आणि वेगवान गोलंदाज शबनम इस्माइल हिला लिलावात खरेदी केलं आहे. तिला संघात घेण्यासाठी मुंबईने 1.20 कोटी रुपयांची बोली लावली आहे. शबनम इस्माईल ही साऊथ आफ्रिकेच्या वनडे आंतरराष्ट्रीय आणि ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी एक आघाडीची बॉलर आहे. शबनम इस्माइलमुळे मुंबई इंडियन्सची बॉलिंग साईड आणखीन मजबूत झाली आहे.

कुठे पाहणार हा लिलाव?
भारतात महिला प्रीमियर लीगचा लिलाव स्पोर्ट्स 18 आणि स्पोर्ट्स 18 एचडी चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच Jio Cinema अ‍ॅप किंवा वेबसाइटवर WPL खेळाडूंचा लिलाव ऑनलाइन पाहू शकतात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : ना. चंद्रकांतदादा पाटील आयोजित चाणाक्य नाट्यप्रयोगास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

WPL 2024 Auction : आज पार पडणार महिला प्रीमियर लीग 2024 चा लिलाव; ‘या’ खेळाडूंवर असणार सगळ्यांची नजर

NIA Raid : मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी NIA ची छापेमारी; ISIS शी संबंधित 13 जणांना अटक

Raigad News : रायगड पोलिसांची मोठी कारवाई ! 106 कोटींचे ड्रग्स जप्त

Robbery News : दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील ‘या’ बँक शाखेत पडतो दरोडा

Pune NIA Raid : इसिस मॉड्युल प्रकरणात NIA ची पुण्यात मोठी कारवाई; 3 जणांना अटक

Wife Murder : धक्कादायक ! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या

Jalgaon News : वडिलांसोबत शाळेत जाताना चिमुकलीचा नियतीने केला घात; कुटुंबाकडून मन हेलावून टाकणारा आक्रोश

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!