Shreyanka Patil

Shreyanka Patil : श्रेयंका पाटीलने रचला इतिहास, WCPL मध्ये खेळणारी ठरली पहिली भारतीय

1583 0

मुंबई : वूमन्स एमर्जिंग अंडर 23 आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या श्रेयांका पाटीलने (Shreyanka Patil) आपल्या खेळीने सगळ्यांनाच प्रभावित केले होते. या खेळीचे तिला आता फळ मिळाले आहे. श्रेयांकाची (Shreyanka Patil) नुकतीच वूमन्स कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत निवड झाली आहे. श्रेयांका यासह या स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. ही वूमन्स कॅरेबियन प्रीमिअर लीग 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. श्रेयांका या स्पर्धेत गयाना अमेजन वॉरियर्स टीमकडून खेळणार आहे. श्रेयांका परदेशी टी 20 लीगमध्ये खेळण्याची संधी मिळवणारी पहिलीच अनकॅप्ड भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

या स्पर्धेत श्रेयांका विंडिज माजी कर्णधार स्टेफनी टेलर हीच्या नेतृत्वात खेळणार आहे. वूमन्स कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेचं यंदाचे हे दुसरं पर्व आहे. या स्पर्धेतील पहिल्या हंगामात फायनलसह एकूण 4 सामने खेळवण्यात आले होते. तर यंदाच्या सीझनमध्ये सामन्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी टीम इंडियाने वूमन्स एमर्जिंग अंडर 23 आशिया कप जिंकला होता.

या स्पर्धेतील कामगिरीसाठी श्रेयांकाला ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ हा पुरस्कार देण्यात आला आहे. श्रेयांका (Shreyanka Patil) टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली याला आपला आदर्श मानते असे तिने एका मुलाखतीमध्ये म्हंटले आहे.

Share This News
error: Content is protected !!