Wrestling

Wrestling : भारतीय कुस्ती महासंघाला मोठा धक्का ! युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने केले निलंबित

1011 0

नवी दिल्ली : वर्ल्ड रेसलिंगने (Wrestling) भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द केलं आहे. कुस्ती महासंघाची (Wrestling) निवडणूक 45 दिवसात करू न शकल्याने युनायटेड वर्ल्ड रेसलिंगकडून ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक 12 ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र पंजाब हरयाणा उच्च न्यायालयाने मतदानाच्या एक दिवस आधी निवडणुकीला स्थगिती दिली होती. या निर्णयामुळे कुस्तीपटूंना आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होता येणार नाही.

भूपेंदर सिंह बाजवा यांच्या नेतृत्वाखाली एडहॉक कमिटी वर्ल्ड रेसलिंग फेडरेशनने दिलेल्या 45 दिवसांच्या मुदतीत निवडणूक घेऊ शकली नाही. भारतीय ऑलिम्पिक संघाने 27 एप्रिल रोजी एडहॉक कमिटीची स्थानपा केली होती आणि या कमिटीला 45 दिवसांच्या आत भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक घ्यायची होती, पण समितीला ही निवडणूक घेता आली नाही.

जर निवडणूक घेण्याची मुदत संपली तर भारतीय कुस्ती महासंघावर निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते असा इशारा 28 एप्रिल रोजी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगकडून देण्यात आला होता. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगकडून आज भारतीय कुस्ती महासंघावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!