World University Games

World University Games : 100 मीटर स्पर्धेत खेळाडूने काढली देशाची लाज; क्रीडा मंत्र्यांना मागावी लागली जाहीर माफी

5088 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचं (World University Games) आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये (World University Games) सोमालियाच्या एका खेळाडूने अशी कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्या देशाच्या क्रीडा मंत्र्यांना आपल्या देशाची माफी मागावी लागली. खेळाडूने केलेल्या लाजिरवाणी कामगिरीमुळे देशातील नागरिकही संतापले आहे. क्रीडा मंत्र्यांनी माफी मागितली तरीदेखील नागरिकांचा संताप कमी होण्याचं नाव घेत नाही आहे.

काय आहे प्रकरण?
चीनमध्ये 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचं (World University Games) आयोजन करण्यात आलं आहे. सोमालियाने यावेळी 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत आपली नवखी धावपटू नसरा अबुबकर अलीला मैदानात उतरवलं होतं. तिने या स्पर्धेत विजेत्या धावपटूच्या तुलनेत तब्बल दुप्पट वेळ घेतला. तेव्हापासूनच लोक संतापले असून क्रीडा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करत आहेत. सोमालियाचे क्रीडामंत्री मोहम्मद बर्रे मोहम्मद यांनी नसरा अबुबकर अलीला या स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड केल्याबद्दल देशाची माफी मागितली आहे.

ही स्पर्धा सुरु झाल्यानंतर सर्वात शेवटच्या नंबरला नसरा होती. सर्व खेळाडू रेषेपार गेल्यानंतरही नसरा मात्र मागे धावतच होती. यानंतर ती हसत हसत रेषा पार करते. रिपोर्टनुसार, 100 मीटरसाठी तिने 21.81 सेकंदाचा वेळ घेतला. विजेत्या धावपटूच्या तुलनेत ही वेळ दुप्पट होती. धक्कादायक बाब म्हणजे नसराकडे अशा स्पर्धामध्ये सहभागी होण्याचा कोणताच अनुभव नव्हता. मात्र तरीही तिची इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी निवड कशी झाली याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

‘या’ अगोदरदेखील झाला होता वाद
सोमालियन खेळाडूंमुळे असा वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये सोमालियचा धावपटू मैरीन नुह म्यूज याच्यावरुन वाद झाला होता. त्याने 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 1 मिनिट 10 सेकंदाचा वेळ घेतला होता. यातील सरासरी वेळ 48 सेकंद आहे. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये मोहम्मद फराह हिने 1 मिनिट 20 सेकंदाची वेळ घेतली होती. विजेत्याच्या तुलनेत तिने 30 सेकंद जास्त घेतले होते. यानंतर तिला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!