Sehar-Shinwari

WC 2023: भारताला हरवलं तर मी तुमच्यासोबत…; पाकिस्तानी अभिनेत्रीची बांगलादेशी खेळाडूंना खुली ऑफर

1374 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकदिवसीय विश्वचषकाच्या (WC 2023) बाराव्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानचा झालेला पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. यामुळे पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने बांगलादेशच्या खेळाडूंना एक खुली ऑफर दिली आहे. अभिनेत्री सेहर शिनवारीने एक ट्वीट केले आहे, ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या ट्विटमध्ये शिनवारीने म्हटले की, बांगलादेशी खेळाडूंनी भारताचा पराभव केल्यास मी त्यांच्यासोबत फिश डिनर करेल, असे तिने म्हटले आहे.

सेहरने बांगलादेशला असं आश्वासन देण्याची ही काही पहिली वेळ नाही. टी20 वर्ल्डकपदरम्यान तिने जर झिम्बॉब्वे संघाने भारताचा पराभव केला तर मी त्यांच्या देशातील तरुणाशी लग्न करेन असं जाहीर केलं होतं. तसंच तिने दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याने नेटकरी तिला ट्रोल करत असतात. तू गेल्यावेळी म्हणाली होतीस ट्विटर सोडेन, चल खोटारडी असं सांगत तिला ट्रोल केलं जात असतं.

या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले आहेत. हे तिन्ही सामने भारताने जिंकले. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया ६ विकेट्सने पराभव केला. यानंतर दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ८ विकेट्सने पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ विकेटने विजय मिळवला. भारताला त्यांचे पुढील सामने अनुक्रमे बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळायचे आहेत.

Share This News
error: Content is protected !!