Pune Cricket

World cup 2023 : भारत-बांगलादेश मॅचवर पावसाचं सावट? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

838 0

पुणे : आयसीसी वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 (World cup 2023) स्पर्धेतील 17 वी मॅच भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये गुरुवारी, 19 ऑक्टोबर 2023 रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर 9 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय मॅच खेळवली जात आहे. या वर्षी जानेवारीमध्ये पुण्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मॅच झाली होती, ज्यामध्ये श्रीलंकेने भारताचा 16 धावांनी पराभव केला होता.

तसेच बांगलादेशची टीम 25 वर्षांनंतर भारतात भारतीय क्रिकेट टीमविरुद्ध वन-डे खेळणार आहे. भारतामध्ये 1998 मध्ये बांगलादेश आणि भारत यांच्यात शेवटची मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आली होती.

कसे असेल हवामान?
बुधवारी, 18 ऑक्टोबर 2023 रोजी भारत व बांगलादेश क्रिकेट टीमने एमसीए स्टेडियमवर सराव केला. या वेळी मात्र हलक्या पावसानं हजेरी लावली. त्यामुळे ग्राउंड स्टाफला मुख्य खेळपट्टी कव्हर करावी लागली. बुधवारी हलका रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज स्थानिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मॅचच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी पुण्यामध्ये पावसाची शक्यता नाही. दिवसा तापमान 32 अंशांपर्यंत राहू शकतं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाची शक्यता 1 ते 4 टक्के आहे. त्यामुळे पाऊस पडला तरी मॅचवर याचा काही जास्त परिणाम होणार नाही.

भारत- रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जड़ेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह और मोहम्मद सिराज

बांग्लादेश- लिटन दास, तंजीद हसन, मेहदी हसन मिराज, नजमुल हुसैन शान्तो, शाकिब अल हसन (कॅप्टन), मुशिफिकुर रहीम (विकेटकीपर), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान और शोरफुल इस्लाम

Share This News
error: Content is protected !!