खेळमनोरंजन

World Cup 2023 : टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला तर मी विवस्त्र होऊन..; ‘या’ अभिनेत्रीचे अजब वक्तव्य

मुंबई : सध्या सगळीकडे वर्ल्ड कपची (World Cup 2023) धामधूम सुरु आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ फायनलमध्ये एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये खेळला जाणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर ठाकले आहेत. या सामन्याची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच एका अभिनेत्रीने टीम इंडियाच्या विजयावरून अजब घोषणा केली आहे.

काय केली घोषणा ?
या अभिनेत्रीचं नाव आहे रेखा बोज असे आहे. ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करते. जर टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला तर समुद्रकिनारी विवस्त्र धावणार असल्याचं तिने जाहीर केलं आहे. रेखा बोजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्ल्ड कपशी संबंधित हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती म्हणतेय की, टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला, तर मी वैजाग बीचवर विवस्त्र धावेन. रेखाने हा व्हिडीओ फेसबुकवरही शेअर केला आहे. रेखाने तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने ‘मंगलयम’, ‘स्वाती चिनुकू संध्या लेलालो’ आणि ‘कलाय तस्मै नम:’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CzqSSmuJVXp/?utm_source=ig_embed&ig_rid=a252c588-e4af-4641-be6a-0fce978928bf

वनडे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडियापुढे रविवारी ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाने याआधी पाच वेळा जेतेपद पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी संघ म्हणून ऑस्ट्रेलियाकडे पाहिलं जातं. त्यामुळे टीम ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाची अंतिम लढत पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.