Virat Kohli - Rohit Sharma

Virat Kohli – Rohit Sharma : रोहित-विराटचा जलवा; पाकिस्तान विरोधात 2 धावा करताच नावावर होणार ‘हा’ विक्रम

749 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli – Rohit Sharma) या जोडीने वनडेमध्ये अक्षरशः आपला जलवा दाखवला आहे. या जोडीला आणखी एक विक्रम करण्याची संधी असणार आहे. या जोडीने उद्या होणाऱ्या पाकिस्तान विरुद्वच्या सामन्यात 2 धावांची भागिदारी केल्यास 5 हजार धावा पूर्ण करणार आहेत. या जोडीने आतापर्यंत 85 डावात 62.47 च्या सरासरीने 4998 धावांची भागिदारी केली आहे. यामध्ये 18 शतकी भागिदारी आणि 15 अर्धशतकी भागिदारी झाल्या आहेत.

रविवारी आशिया चषकातील सुपर 4 फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. यामध्ये टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. या दोन्ही खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये आतपर्यंत धावांचा पाऊस पाडला आहे. रोहित आणि विराटची जोडी पाच हजार धावांची भागिदारी करण्यापासून दोन पावले दूर आहे.

वनडे फॉरमॅटमध्येटीम इंडियासाठी आतापर्यंत केवळ 2 जोड्यांनी 5000 धावांचा टप्पा पार पार केला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली, रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीचा समावेश आहे. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी वनडेमध्ये 8227 धावांची भागिदारी केली आहे. तर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी 5193 धावांची भागिदारी केली आहे. जर रोहित आणि विराट पाकिस्तानविरुद्ध ही कामगिरी करण्यात यशस्वी ठरले तर ते हा टप्पा गाठणारी सर्वात जलद जोडी ठरेल.

Share This News
error: Content is protected !!