Rohit And Babar Azam

Asia Cup 2023 ची तारीख ठरली ! ‘या’ दोन देशांमध्ये खेळवली जाणार स्पर्धा

1018 0

क्रिकेट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आशिया चषक 2023 वरून सुरु असलेला वाद अखेर मिटला आहे. या आशिया चषकात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ( PCB) हायब्रिड मॉडेललाही परवानगी मिळाली आहे. त्यानुसार आशिया चषक स्पर्धेतील भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे.IND vs PAK हा बहुचर्चित सामना श्रीलंकेत पार पडणार आहे. BCCI आणि PCB यांच्यातला वाद मिटल्यामुळे ICC नेही सुटकेचा निश्वास टाकला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने गुरुवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली.

कशी असेल स्पर्धा ?
31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर 2023 या कालावधीत आशिया चषक दोन देशांमध्ये खेळवला जाणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ यांच्यात एकूण 13 वन डे सामने होणार आहेत. या संघांची दोन गटांत विभागणी केली जाणार आहे आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 4 मध्ये खेळतील आणि त्यातून फायनलचे दोन संघ ठरतील.

कुठे खेळवण्यात येणार सामने?
या स्पर्धेतील 4 सामने पाकिस्तानात होणार आहेत. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे पहिल्या टप्प्यात पाकिस्तानात खेळतील, नंतर दुसऱ्या टप्प्यात श्रीलंकेत भारताविरुद्ध सामन्यांसाठी येतील. श्रीलंकेतच फायनल खेळवण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!