arshdeep-singh

सेंच्युरी ठोकणाऱ्या खेळाडूचा अर्शदीपने तीन टप्पे लांब उडवला स्टम्प

954 0

लंडन : टीम इंडियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) सध्या इंग्लंडमध्ये (England) काऊंटी क्रिकेट (County Cricket) खेळत आहे. काऊंटी क्रिकेटमध्ये अर्शदीपने केंट टीमकडून डेब्यु केला आहे. या स्पर्धेत तो कमालीचे प्रदर्शन करताना दिसत आहे. अर्शदीप सिंह हा ऑफ द विकेट असो, वा राऊंड द विकेट अशा दोन्ही बाजूंनी विकेट टेकिंग बॉलिंग करू शकतो. त्याने या सामन्यात भेदक गोलंदाजीच्या बळावर शतक ठोकणाऱ्या फलंदाजाला तंबूची वाट दाखवली आहे. त्याची ही कामगिरी बघून WTC फायनलमध्ये (WTC Final) त्याला न खेळवून टीम इंडियाने चूक तर केली नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या त्याच्या या विकेटची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

काय घडले सामन्यात?
केंट आणि सरेमध्ये सुरु असलेल्या सामन्यात अर्शदीपचा जलवा पाहायला मिळाला. या मॅचमध्ये केंटने सरेसमोर विजयासाठी 501 धावांच अवघड लक्ष्य ठेवलं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना सरेच्या टीमने 3 बाद 263 धावा केल्या आहेत. यामध्ये जेमी स्मिथने (Jamie Smith) महत्वाची भूमिका पार पडली होती. जेमी स्मिथने फक्त 77 चेंडूत 114 धावा फटकावल्या होत्या. केंटसाठी तो धोकादायक ठरत होता. त्याचा धोका वाढण्याआधीच भारताच्या अर्शदीप सिंहने त्याची विकेट घेऊन अडसर दूर केला.

विकेटची जोरदार चर्चा
अर्शदीपने ऑफ द स्टम्प बॉलिंग करताना जेमी स्मिथला क्लीन बोल्ड केलं. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगात आतमध्ये आला. स्मिथला अंदाज आला नाही. लांबलचक त्याचा ऑफ स्टम्प उडाला. हा स्टम्प तीन टप्पे उडून पडला. सध्या या विकेटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!