Team India

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा

613 0

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्याच्या वनडे मालिकेसाठी (IND vs AUS) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. पहिल्या दोन सामन्यासाठी केएल राहुल टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे. तर तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा कॅप्टन असणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सामने खेळवले जाणार आहे. त्यातील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर खेळवला जाईल. तर 24 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी उर्वरित दोन सामने खेळवण्यात येणार आहेत. हे तिन्ही मायदेशी खेळवण्यात येणार आहेत.

पहिल्या दोन सामन्यासाठी टीम इंडिया:
केएल राहुल (C), रवींद्र जडेजा (VC), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन (WK), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण

IND vs AUS च्या तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया :
रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या, (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (WK), इशान किशन (WK), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल*, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

IND VS AUS वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाची टीम:
पॅट कमिन्स (C), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, जॉश इंग्लिश, स्पेंसर जॉनसन, मार्नश लाबुशेन, मिचल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जम्पा.

Share This News
error: Content is protected !!