Wanindu Hasaranga

Wanindu Hasaranga : श्रीलंका संघाला मोठा धक्का! वानिंदू हसरंगाची अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती

785 0

श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने स्वतः श्रीलंका क्रिकेट बोर्डाला याची माहिती दिली आहे. त्याने (Wanindu Hasaranga) अचानक निवृत्ती का घेतली याचे कारणदेखील समोर आले आहे. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये जास्त वेळ खेळण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे त्याने म्हटले आहे. वानिंदू हसरंगा सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतो.

श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने श्रीलंकेच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याचा निर्णय मान्य केला आहे. निवृत्त होण्यापूर्वी हसरंगाने श्रीलंकेसाठी चार कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने एकूण 196 धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच त्याने 4 विकेट घेतल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!